मलकापूर : पारंपरिक पिकांच्या मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे. त्यामध्ये बदल होण्यासाठी शेतकऱ्यांनी आता उर्जादाता व्हावे, डांबरनिर्मिती करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मलकापूर येथे केले. नांदुरा ते चिखली रणथम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे लोकार्पण नितीनजी गडकरी यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे,मा.आमदार चेनसुख संचेती,अँड.आकाश फुंडकर, संजय कुटे,श्वेताताई महाले,उमाताई तायडे वसंत खंडेलवाल,विजयराव शिंदे,यांच्यासह अतिथी उपस्थित होते. पुढे बोलताना ना.गडकरी यांनी रस्त्याचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ३ टक्के काम येत्या महिन्याभरात ते पूर्ण होईल. या रस्त्याने गुजरातमध्ये वेगाने पोहचता येईल. विदर्भाच्या विकासासाठी रस्त्याचा विकास महत्त्वपूर्ण आहे.त्यासाठीच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे.त्याचा फायदा आता कृषी उत्पादनाला वेळेत पोहचवण्यासाठी होईल. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांसोबतच वीजनिर्मिती करावी, इथेनाँल, डांबर निर्मितीसाठी विविध उपक्रम केंद्र शासनाच्या वतीने येत्या काळात राबवल्या जातील. त्यासाठी असलेल्या शासकीय योजनाही सुरू केल्या जातील, त्याचा शेतकऱ््यांना लाभ होईल. त्यामुळे विदर्भातील बेकारी, भूकबळी, आत्महत्यांना आळा बसेल, असेही ना. गडकरीगेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 81 किलोमीटर वरून 353 किलोमीटरवर गेला आहे ही कामे करताना नदी नाले शेततळे खोदून करण्यात येत आहे जागतिक दर्जाचे रस्ते तयार होत असताना यातून शेतकऱ्यांसाठी श्वासन सिंचनाची सोय निर्माण झाली जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी जिगाव प्रकल्पाला सहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जिल्ह्याची सिंचन क्षमता ७० टक्क्यावरून नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
खारपाण पट्ट्यात तलाव बांधून यात खाऱ्या पाण्यातील झिंग्याचे उत्पन्न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्राप्तीमध्ये चांगली वाढ होण्यास मदत होईल स्मार्ट शहर होण्यासोबतच स्मार्ट खेडेही निर्माण होणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय देश आत्मनिर्भर होणार नाही शेतकऱ्यांनी बायोडिझेलच्या उत्पादनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न होता आता ऊर्जा दाता होणे गरजेचे आहे केंद्र शासनाने नॅनो युरिया उपलब्ध करून दिल्यामुळे उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे येत्या काळात प्रत्येक गावात चार ड्रोन देऊन त्याद्वारे फवारणी होणार आहेयामुळे पिकांन पर्यंत परिणामकारक खत मिळणार आहे यावेळी जिल्ह्यातील रस्ता विकासाच्या झालेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख, गणेश मांटे, मोहनजी शर्मा,विजयराव जाधव, शंकर पाटील,मिलिंद डवले,संजय काजळे, विजय डागा,अरविंद किणगे, नानाभाऊ येशी, अमोल टप, दुर्गेश राजापुरे, अनिल सिंह राजपूत,सागर बेलोकार,आशिष माहुरकर, रवी वानखेडे, विशाल मधवानी,राजकुमार वानखेडे, वीरेंद्र कासे,स्वप्निल नाफडे, प्रशांत पाटील, गजानन आटोळे, देविन टाक, संभव जैन, राहुल भोपळे, संकेत खर्चे, सचिन बढे यांच्यासह अदि कार्यकर्ते व जणसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق