Hanuman Sena News

यंदा महाराष्ट्र पोलिसांना पदकच नाही यादी जाहीर ...




देशातील उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना नुकतेच गृहमंत्रालयाने पदके घोषित केली आहे. यंदा त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलिंसासह मुंबई पोलिसांना एकही पदक मिळाले नाही. देशभरातील 140 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली.महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले. मात्र महाराष्ट्राला यंदा पदकं मिळाले नाहीत. यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पोलिसांना 11 पदकं मिळाली होती. मात्र यंदा एकही पदकं मिळाली नाही. यंदा 140 पदकं विविध विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. मात्र महाराष्ट्राती एकाही अधिकाऱ्यांचे यात नाव नाही.वर्ष 2023 साठी “केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपासासाठी” 140 पोलीस कर्मचार्‍यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पदके देण्याचा उद्देश गुन्ह्याच्या तपासातील अधिकाऱ्यांना मानकांन, प्रोत्साहन देणे आणि तपासातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याचा आहे. दरवर्षी 12 ऑगस्टला याची घोषणा केली जाते. हे पुरस्कार प्राप्त करणार्‍या अधिकाऱ्यांमध्ये 15 सीबीआय, 12 एनआयए, 10 उत्तर प्रदेश, 09 केरळ आणि राजस्थान, 08 तामिळनाडू, 07 मध्य प्रदेश आणि 06 गुजरात आणि उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये 22 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Post a Comment

أحدث أقدم