मलकापूर: मलकापुर बोडवड रोड स्थित हॉटेल अनुप जवळ एका विहिरीत एका अज्ञात गाईचे वासरू पडलेले होते अशी सूचना बजरंगदलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली असता घटना स्थळी पोहोचून त्यांची रेस्क्यू द्वारें गाईच्या वासरूचे प्राण वाचवले.त्या वेळी त्या वासरुला विहिरीत उतरून वर काढण्यात आले तेव्हा वासरूच्या तोंडाला मार लागलेले आहे व त्यातून थोड्या प्रमाणात रक्त स्त्राव ही होत होते ते बघता कार्यकर्तानी उपविभागीय पशू अधिकारी भोळे साहेब यांना फोन लावून या बाबत सूचना दिली व काही क्षणातच ते डॉक्टर घटना स्थळी पोहोचून त्या गौवंश वर उपचार केला व गौवंश यांचे प्राण वाचविले. स्थानिक लोकांनी बजरंग दल सदस्यांचे मनापासून आभार मानले त्यावेळेस रितेश दहिभाते, बबलू वैष्णव ,सनी ठाकूर, ईश्वर मांडवाले ,वासुदेव गोरे, ओम इंगळे ,आशिष जंगले, हर्ष तायडे मंगेश काजळे, पवन सांभार, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
बजरंग दल गौरक्षकांनी वाचवले गाईच्या वासरूचे प्राण
Hanuman Sena News
0
إرسال تعليق