चिखली : तालुक्यातील शेलूद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक पदावर कार्यरत रेखा गिते यांच्यावर भ्रष्टाचारसह इतर आरोप करीत ग्रामस्थांनी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चिखली कार्यालयावर धडक देत कारवाईची मागणी केली होती. मात्र, पंचायत समितीने आश्वासन देऊनही कारवाई केली नसल्याने २४ जुलै रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक देऊन आक्रमक भूमिका घेतली.अखेर ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासनास झुकावे असून व संबंधित ग्रामसेविकेस पदमुक्त करावे लागले आहे. शेलूद येथे कार्यरत ग्रामसेविका गिते यांनी ९० दिवस बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्रावर सही देण्यासाठी टाळाटाळ करणे व सहीसाठी ५०० रूपये देण्याची मागणी करीत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालय येथे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने ग्रामसेविकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, ३ दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह मनसे जिल्हाध्यक्ष बरबडे व पदाधिकाऱ्यांनी २४ जुलै रोजी पुन्हा एकदा पंचायत समितीवर धडक दिली.यावेळी जोपर्यंत ग्रामसेवक गिते यांच्या कारवाई होत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, असा आक्रमक पावित्रा ग्रामस्थांनी घेतला. ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसेविकेविरोधा आरोपांची सरबत्ती लावली. ग्रामपंचायत कार्यालयात प्रोसिडिंग बुकवरील कोऱ्या कागदावर ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या घेणे, शासकीय सुविधांचा लाभ न देणे, डेंग्यूसदृश परिस्थितीमध्ये औषध फवारणी, धूर फवारणी न करणे, विविध दाखल्यांवर सहीसाठी ५०० रुपये द्या तेव्हाच सही करते, अशा पध्दतीने वागत असल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. ग्रामस्थांचा आक्रमक पावित्रा पाहता संबंधित ग्रामसेविकेस तातडीने पदमुक्त करण्यात आले आहे.लवकरच नवीन ग्रामसेवक रुजू करू व ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण करू, असे आश्वासन गटविकास अधिकारी एस.डी.भारसाकळे यांनी दिले. यावेळी मनसेचे बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, संदीप नरवाडे, प्रवीण देशमुख, रवी वानखेडे, अरुण येवले, बंटी कळमकर, संजय दळवी, विशाल इंगळे, वैभव देहाडराय, ग्रा.प.सदस्या राजनंदनी हजारे, मंगेश इंगळे, विशाल दहीकर, वसंता इंगळे, राजू इंगळे, परमेश्वर इंगळे, संतोष सावंत, सुरेश तेजनकर, विशाल वानखेडे, शेषराव साळवे, वंदना इंगळे, अश्विनी इंगळे, सुनीता नवले, संगीता इंगळे, मंदाबाई इंगळे, बालाबाई भंडारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेविकेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर दिली धडक ! ग्रामसेविका पदमुक्त...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق