Hanuman Sena News

कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या माकडावर हनुमान सेनेने केले अंतिम संस्कार...



तळणी: गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असुन पाळीव प्राणी यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.आता या कुत्र्यांनी माकडाचा  बळी घेतला आहे.अत्यंत चपळ जात म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या माकडाचा तळणी येथे मोकाट कुत्र्यांनी बळी घेतला.गावातील हनुमान सेनेचे कार्यकर्ते अजय तायडे हे सुपडा गावंडे यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी सोयाबीन पेरणीसाठी गेले असता तेथे एका झाडांवर माकड बसलेले होते त्यातील काही माकड झाडांवर उड्या मारतांना दिसलें एक माकड झाडावरून खाली येऊन पडले ते माकड खाली येऊन पडताच त्याच्यावर खाली बसलेल्या मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर गंभीर रित्या हमला केला. त्या माकडाच्या छातीवर, मांडीवर,गळ्याभोवती कुत्र्यांनी चावा केला रक्तस्त्राव खुप मोठा प्रमाणात झाल्याने माकड बेशुद्ध अवस्थेत पडले. त्या ठिकाणी धावत जाऊन अजय तायडे यांनी त्या कुत्र्यांना हाकलून लावले व सदर माकडाला उचलून आणले  त्या माकडाला पाणी पाजले पण त्या माकडाला वाचवण्यात यश आले नाही. यावेळी मृत्यू पावलेल्या माकडाला विधीवत पूजा करून पुरवण्यात आले यावेळी हनुमान सेनेचे अजय तायडे , सुपडा गावंडे , वैभव तायडे,सुरेश इंगळे होते.

Post a Comment

أحدث أقدم