Hanuman Sena News

"माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझा फोटो वापरायचा नाही"; शरद पवारांची वार्निंग...


 महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच कुटुंबाचं नाव गाजतंय ते म्हणजे पवार कुटुंब. अजित पवार यांनी आपले काका, राष्ट्र्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेत नवा मार्ग स्वीकारला. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर रविवारी अचानक राज्यात राजकीय भूकंप झाला. अजित पवारांच्या साथीने छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गजांनीही सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर सुरूवातीला शरद पवारांनी संयमी भूमिका घेतली होती. मात्र आता शरद पवारांनी चांगलीच रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्यांना माझे विचार पटत नाहीत, त्यांनी माझा फोटो वापरायचा नाही, असे त्यांनी थेट सांगितले "ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत त्यांनी माझा फोटो वापरु नये. जिवंतपणी फोटो कोणी. वापरावा हा माझा अधिकार आहे. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विश पाटील आहेत. त्यांनी माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये," असे अतिशय रोखठोक मत शरद पवार यांनी मांडले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच वेळी अजित पवार यांच्या गटाने मुंबईत एका नव्या राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन केले. त्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते. त्याच वेळी शरद पवार यांनी फोटोबाबत ही गोष्ट स्पष्ट केल्याने काका-पुतण्यांमधील संघर्ष तीव्र झाल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादी आणि विशेषत: अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, प्रतिस्पर्धी आमदारांना बळ देतात अशी भूमिका मांडून गेल्या वर्षी शिंदे गट मविआच्या सरकारमधून बाहेर पडला. पण आता शिंद गटातील आमदारांनी अजित पवारांच्या सोबत सत्तेत पुन्हा बसावे लागणार आहे त्यामुळे शिंदे गटातील बरेचसे आमदार नाराज आहे अशी चर्चा शपथविधीपासूनच जोर धरू लागली होती त्यामुळे सत्तेत काही प्रमाणात संघर्ष असल्याचे बोलले जात असतानाच आता अजित दादा यांनी त्यांच्या गटाला थेट शरद पवारांनीच विरोध केल्यामुळे पुढील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

أحدث أقدم