Hanuman Sena News

मुलीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने ठोठावली एक वर्षाची शिक्षा...


मलकापूर: एका मुलीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुक्यातील आळंद येथील वैभव गुणवंत भगत या आरोपीस न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.वैभव गुणवंत भगत, अमोल अरुण भगत,कैलास कृष्णा घोराडे या तिघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 21 एप्रिल 2016 रोजी कलम 354 (अ ),201भांदवि व कलम 67 माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा नोंदवून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्रमांक दोन मध्ये हा घटना चालला.दरम्यान न्यायाधीश एस. एम. आहेर यांनी आरोपी वैभव गुणवंत भगत यास कलम 354 मध्ये एक वर्ष साधा करावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.उर्वरित दोघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सहा वर्षे चाललेल्या या न्यायालयीन प्रक्रियेत एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सहाय्यक सहकारी अभियंता कृष्णा व्ही गारमोडे यांनी केलेला युक्तिवाद व दाखल केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून आरोपी वैभव गुणवंत भगत यास शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी ऍडव्होकेट दिनेश वाकोडे सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी मार्गदर्शन केले. तर तपास अधिकारी म्हणून पीएसआय मोनालीया मोरे यांनी कोर्ट पैरवी म्हणून सोळंके यांनी काम पाहिले.

Post a Comment

أحدث أقدم