मलकापूर: दिव्यांगांना राखीव असलेला ५ टक्के निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा मलकापूर नगर परिषदे समोर एकदिवशीय आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद,नगर पंचायतींना दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवून खर्च करण्याचे आदेश आहे,मात्र नगर परिषदने दिव्यांगांसारठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप पर्यंत वितरीत केलेला नाही.तसेच सदरचा निधी ३℅ असताना २००० रू प्रत्येकी वाटप करण्यात येत होते मात्र आता मर्यादा वाढून ५℅ करण्यात आली असून सुद्धा २००० रू च वाटप कोणत्या आधारे करण्यात येते याबबात न. प. ने खुलासा केलेला नाही.दिव्यांगंच्या हक्काचा निधी तातडीने वितरण न झाल्यास दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूरच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.त्यावेळी उपस्थित दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे,जिल्हाध्यक्ष नागेश सुरंगे महाराष्ट्र प्रदेश सल्लगार पंकज मोरे,जिल्हा महासचिव राजीव रोडे, महासचिव संतोष गणगे, जिल्हा सचिव शरद खुपसे, सदस्य अंकित नेमाडे, प्रकाश वाघ, ओंकार रायपुरे, मो. जावेद, आसिफ खान, विवेक राजापुरे, भास्कर सोनार, अविनाश पाटील, अनिल कुमार कटारिया, अशोक पवार,दिलीप दगडे,किशोर केणे इत्यादी उपस्थित होते.
दिव्यांगांना ५℅ निधी त्वरीत वाटप न केल्यास दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चा आंदोलनाचा ईशारा
Hanuman Sena News
0
إرسال تعليق