मलकापूर: तालुक्यात सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढले असतानाच आता डोळे येण्याच्या साथीमुळे रुग्ण हैराण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कंजंक्टिव्हायटिस यालाच डोळे असे म्हणतात. हा आजार संसर्गजन्य आहे एकापासून तो दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता अधिक असते.तालुक्यात सध्या या संसर्गाचे थैमान पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून या साथीचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या व्यक्तीला डोळ्याचा संसर्ग झाला आणि त्यांनी योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला डोळ्याचा संसर्ग झाल्यास त्याने डोळे पाण्याने स्वच्छ धुवावे डोळ्यांना सतत हात लावू नये. रुमालाने डोळे चोळू नये,घरातील अन्य सदस्यांपासून लांब राहावे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही प्रकारचे घरीच औषध उपचार न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डोळे येण्याची नेमकी कारणे जिवाणू अथवा विषाणूंच्या संसर्गामुळे कंजक्टिव्हाटीस होतो. यांचे संक्रमण एका दुसऱ्या व्यक्तीला होते. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल चष्मा आय ड्रॉप्स किंवा सौंदर्यप्रसाधने यांचा वापरामुळे इतरांकडे त्यांचा प्रसार होतो. सामान्यपणे आपल्या डोळ्यातील पांढऱ्या भागावर आणि पापण्यांच्या आतील भागावर पारदर्शक असा थर असतो त्याला कंजक्टिव्हा असे म्हणतात.डोळे येणे म्हणजे याच कंजक्टीव्हाला सूज येणे होय.डोळ्याची स्वच्छता राखावी डोळ्यांना हात लावल्यानंतर अथवा आय ड्रॉप डोळ्यात टाकल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत डोळे आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडताना अथवा लोकांच्या संपर्कात येताना काळा चष्मा वापरावा.आपला रुमाल चष्मा आय ड्रॉप अथवा इतर वस्तू इतरांना वापरण्यात येऊ नयेत.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वेळीच उपचार घ्यावे.तरी नेत्र तज्ञांनी सांगितले की सध्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे.त्यामुळे एकाचा दुसऱ्याला हा आजार पसरतो. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
सावधान...डोळे येण्याच्या साथीने आता पसरले पाय!
Hanuman Sena News
0
إرسال تعليق