मलकापूर : ज्यांनी शस्त्र हातात घेऊन मनगटाची ताकद दाखविली. ज्ञानाच्या आणि बौद्धिक क्षमतेच्या माध्यमातून शास्त्राची ताकद दाखवली शस्त्र व शास्त्र याचे बाळकडू ज्या मुलांना लहानपणी मिळते तेच मुले इतिहास घडवतात. आणि इतिहास याचा साक्षीदार आहे.बाळकडू देण्याची जबाबदारी निसर्गाने एका स्त्रीवर दिलेली आहे. ते इतिहासच सांगतो. असे प्रतिपादन सौ.गौरीताई थोरात यांनी विश्व हिंदू परिषद द्वारे आयोजित दुर्गा वहिनीच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोपीय प्रसंगी केले.मलकापूर येथे दिनांक 11 जून 23 जुलै रोजी पर्यंत महिला व मुलींसाठी महिला सशक्तिकरण आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी एका विशेष वर्गाचे आयोजन विश्व हिंदू परिषद,मातृशक्ती दुर्गा वहिनी द्वारे करण्यात आले होते.सदर वर्गाचा समारोप ली.भो.चांडक विद्यालयाच्या पटांगांवर करण्यात आला.पुढे गौरीताई थोरात यांनी बोलताना सांगितले की कौशल्या विना राम न झाला, देवकी पोटी कृष्णा जन्माला, शिवरायांचे चरित्र घडविले माय जिजाबाईने राजमाता,राष्ट्रमाता स्वतः शस्त्र शास्त्र पुराण यात प्रारंगत होत्या. त्यांनी ही गोष्ट अचूक घेतली. स्त्रिया स्वयंपाक घरात मर्यादित न राहता प्रसंगी रणांगणात पराक्रम ही करू शकता, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळून येते त्यांनी तसे दाखवून दिले. आपण येथे महिला आत्म सुरक्षा प्रशिक्षण अभियानाचा वारसा घरी घेऊन जात आहे.पण हा त्याच अभिमानाने पुढच्या पिढीकडे सुपूर्त करायचा आहे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मुलींमध्ये निर्भरता आणण्यासाठी फक्त शस्त्र हातात घेऊन पक्के बनवणे भाग आहे. असे गौरी ताई थोरात कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी बोलताना सांगितले की, आपण खूप भाग्य शाली आहे की आपल्याला फार चांगला परिवार मिळालेला आहे. पण मी सांगू इच्छितो अन्याय अत्याचार, व छळ यांना खचून जाऊ नये. साक्षात जिजाऊ, सावित्रीबाईची आम्ही लेक आहोत हे विसरू नये. असे अशोक थोरात बोलत होते.या कार्यक्रमांमध्ये नगर संघ चालक दामोदर लखानी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना सांगितले की महिला व मुलींसाठी असे शौर्य प्रशिक्षण वर्ग घेणे काळाची गरज आहे.दरम्यान शहरातून मुख्य मार्गाने दुर्गा वाहिनीचे शौर्य पतसंचलन काढण्यात आले.संचलन दरम्यान चौका चौकामध्ये मुलींनी प्रात्यक्षिक दाखविले. यामध्ये दंड, लाठी काठी, नि-युद्ध, खडग, छुरीगा, योगासन, मनोरा असे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, मुख्य मार्गदर्शक म्हणून गौरीताई थोरात खामगाव.हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दामोदरजी लखानी नगर संघ चालक हे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून विश्व हिंदू परिषद चे विदर्भ प्रांत सहमंत्री अॅड अमोल अंधारे, प्रांत संघटन मंत्री विश्व मांगल्य गो ग्राम यात्रा चे तेजसताई जोशी, दुर्गा वाहिनी प्रांत सह संयोजिका रोशनी तायडे, विहिप जिल्हा मंत्री राजेंद्र सिंह राजपूत हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कपले, प्रस्तावना सौ.भारतीताई वैष्णव, आभार प्रदर्शन सौ.नेहाताई सदावर्ते मातृशक्ती नगर संयोजिका यांनी केले.शौर्य प्रशिक्षण वर्गाकरिता शिक्षण देण्याकरिता लाभलेले शिक्षक म्हणून लाभलेले बापूसाहेब करंदीकर, श्याम उपल , रवींद्र गणगे, मिलिंद काळे, केशव किन्हनोळकर, भूषण कुलकर्णी, ईश्वर दीक्षित यांच्या मोलाचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता विश्व हिंदू वर्ष जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण तायडे, जिल्हा सहमंत्री सुयोग शर्मा, विहिप तालुकाप्रमुख संमती जैन, बजरंग दल प्रखंड संयोजक दीपक कपले,शहर अध्यक्ष दिलीप पाटील, विश्व हिंदू परिषद सेवा विभाग प्रमुख दीपक चवरे, श्याम भल्ला, रमण व्यास रवींद्र जवरे, दुर्गा वाहिनी प्रखंड संयोजिका कु. प्रीती फाटे, दुर्गा वाहिनी नगर संयोजिका कु.स्नेहल भोसले, दत्तात्रय तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शस्त्र व शास्त्र यांचे बाळकडू मिळालेली मुले इतिहास घडवतात-सौ.गौरीताई थोरात यांचे प्रतिपादन
Hanuman Sena News
0
إرسال تعليق