मलकापूर : मातृशक्ती विदर्भ प्रांत सहसंयोजिका सौ फुलवंती ताई कोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज रोजी 11 वृक्ष लावून वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी मलकापूर मातृशक्ती प्रखंड संयोजीका सौ. स्नेहा ताई सदावर्ते, नगर मातृशक्ती संयोजका सौ. अश्विनी ताई काटे, मातृशक्ती सत्संग प्रमुख, भारतीताई वैष्णव,व सुवर्णाताई वैष्णव, तसेच विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण तायडे, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री श्री सुयोग भाऊ शर्मा, विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष श्री दिलीप जी पाटील, श्री नितीन काका सदावर्ते, विश्व हिंदू परिषद चे प्रचार प्रसार प्रमुख दत्तात्रय तायडे , नगर सत्संग प्रमूख शामसिंह भल्ला यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.श्रीकृष्ण जन्मअष्टमीला विश्व हिंदु परीषद संघटनेस ६० वर्ष पूर्ण होत आहे या वर्षी संघटना विविध कार्यचे आयोजन करणार आहे या निमित्य मातृशक्ती व्दारे ६१ औषधी वृक्ष क्षावण महिन्यात लावण्याचा संकल्प केला आहे. त्या निमित्याने विदर्भाचे प्रवेश द्वारा मानले जाणारे मलकापुर शहरातील ११ वृक्ष लाऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती द्वारे वृक्षारोपण सष्टी पूर्ती वर्ष निमित्य आरंभ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق