Hanuman Sena News

जिल्हातील धर्मांतरणात सहभागी असलेल्या मदरसांची चौकशी करुन कार्यवाही करा - वि.हि.प.बजरंग दलाची मागणी







मलकापूर : आलेगाव (बाळापूर) मधील धर्मानतरणात सहभागी असलेल्या मदरसांच्या चौकशी करुन कार्यवाही करने बाबत वि. हि.प व बजरंगदल यांच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा यांना उपविभागिय अधिकारी साहेब मलकापूर द्वारे आज दिनांक १४-०७-२०२३ रोजी निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात नमूद केले  होते की,देशात विविध ठिकाणी त्याचबरोबर महाराष्ट्रातही विविध भागांमध्ये धर्मातरण मोठ्या प्रमाणात होत आहे.अश्या घटना आपल्या भागातही सुद्धा घडत आहे.नुकतीच आलेगाव या ठिकाणी अनुसूचित जातीच्या परिवाराचे धर्मांतरण करण्यात आले आलेगाव (बाळापूर), शुभम नावाचा मुलागा यास मो. अली याला उंद्री येथील मदरस्या मध्ये ठेवण्यात आले होते.यामध्ये त्याच्या आईच्या तक्रारी वरून अट्रॅसिटी गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. तसेच उदयनगर या ठिकाणी सुद्धा अशीच धर्मातराची घटना घडलेली समजते.सदर धर्मांतरानाच्या घटनांमध्ये ज्या मदरसांचा सहभाग आहे.अश्य मदरस्याला परदेशातून अवैधरीत्या धनराशी मिळत असते.त्यामुळे गरिब लोकांना प्रलोभन दाखवून,धाकदपट करून धर्मांतरण केले जाते. अश्या प्रकरणात तरी योग्य चौकशी करून दंडात्मक  कारवाई करावी,जेणे करुन अश्या लोकांच्या मनात प्रशासन यांचे दडपण राहील अशी विनंती निवेदनाद्वारे विश्व हिंदु परीषद बजरंगदल कडून करण्यात आली. सदर निवेदन प्रतीलीपी मा. अमितजी शाहा,गृहमंत्री हिंदूस्थान,दिल्ली तसेच मा. देवेंद्रजी फडणवीस,गृहमंत्री महाराष्ट्र, मुंबई यांना दिली आहे.
या वेळी मोठ्या संख्येत वि.हि.प व बजरंगदलाचे कार्यकर्ता संख्येत उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم