पारोळा - महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा येथील गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (४४, रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छळास कंटाळून महिलेने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या.महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, डिसेंबर २०२१ पासून हा प्रकार सुरू आहे. बीडीओ या महिलेस दालनात बोलावून विचित्र हावभाव करायचे. या महिलेने पतीला सांगण्याची धमकी दिली. यावर या अधिकाऱ्याने तिला बदनाम करण्याचा दम भरला. यानंतर जळगावात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या दिवशी महिलेस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याबाबत ही महिला जाब विचारण्यासाठी गेली असता अधिकाऱ्याने तिला अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले.या प्रकाराला कंटाळून या महिलेने जादा प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. यातून बरे वाटू लागल्याने तिने शनिवारी फिर्याद दिली. त्यावरून पारोळा पोलिसात बीडीओ लोंढेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गंभीर शिंदे करीत आहेत.
बिडिओविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق