कोपरगाव (जि. अहमदनगर) : शहरातील मध्यवर्ती भागातील २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर खडकीजवळील एका मदरशात नेऊन चौघांनी अत्याचार केला. त्याचे फोटो व व्हिडीओ तयार करून तरुणीला ब्लॅकमेल करत इंदौर येथे बोलावून तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. तसेच बळजबरीने धर्मांतर करून तिच्याकडून प्रार्थना म्हणवून घेतली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात इंदौरच्या एका धर्मगुरूसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सायम कुरेशी (रा. जुना पिठा, इंदौर, मध्य प्रदेश), इमरान अयुब शेख (रा. कोपरगाव), छोटू उर्फ कलिम (पूर्ण नाव माहीत नाही), फय्याज (पूर्ण नाव माहीत नाही दोघेही रा. कोपरगाव) व इंदौर येथील मौलवी (पूर्ण नाव माहिती नाही) अशा पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सायम कुरेशी याने तीन वर्षांपूर्वी मोबाइलवरून फिर्यादीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एक वर्षाने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून २१ मे २०२३ रोजी सकाळी ६ ते १२ च्या दरम्यान त्याने फिर्यादी व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यांनी त्यास विरोध केला असता वरील आरोपींपैकी नं. १ ते ४ यांनी संगनमताने फिर्यादीचे हातपाय धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तिला बळजबरीने तिच्याच दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून खडकीजवळील मदरशात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्याचे फोटो व व्हिडीओही काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला इंदौर येथे बोलावून घेतले. तिथे एका घरात आरोपी सायम याने तरुणीवर अत्याचार केले. तसेच इंदौर येथील एका धर्मगुरूकडून बळजबरीने तरुणीला प्रार्थना करण्यास भाग पाडले. धर्मांतरासाठी व आरोपी सायम बरोबर लग्न करण्यासाठी दबाव आणला वेळोवेळी तरुणीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहे.
धर्मांतराची धमकी देऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق