मलकापूर : गेल्या काही दिवसांपासून देशात संतांना मारहाण करण्याचे षडयंत्र सुरू आहे, याचे उदाहरण बुधवार दिनांक ०५/०७/२०२३ रोजी दिगंबर जैन मुनी आचार्य श्री कमकुमार नंदीजी महाराज यांचे चिकोडी येथे जिहादींनी केलेल्या अपहरणानंतर घडले. बेळगाव कर्नाटक येथे जैन मुनी महाराज यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या पवित्र देहाचे तुकडे करण्यात आले. या घटनेने संपूर्ण भारतातील धार्मिक आणि आध्यात्मिक जगाला धक्का बसला आहे.या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलकापूर मार्फत केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शाह यांच्याकडे उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर द्वारा मागणी केली की, संपूर्ण जगाला अहिंसेचा धडा शिकवणाऱ्या आदरणीय व्यक्ती जैन आचार्यजींच्या हत्येची सी.बी.आय मार्फत चौकशी करून मारेकऱ्यांना व त्यांच्या साथीदारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा घटना इतर हिंदू साधू-साध्वींसोबत पुन्हा घडू नये या करिता सदर निवेदन देण्यात आले.
कर्नाटकातील दिगंबर जैन साधू आचार्य श्री कमकुमार नंदी यांच्या निर्घृण हत्येची सी.बी.आय चौकशी करा -विश्व हिंदू परिषद ची मागणी
Hanuman Sena News
0
إرسال تعليق