मुंबई - राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव केला असून प्रमुख पक्षातील अनेक आजीमाजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय राजकारणात आणला असून विविध राज्यांत तो पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातही अब की बार, किसान सरकार असा नारा देत बीआरएसने राज्यातील शेतकऱ्यांना साद घातली आहे. त्यात बीआरएस पक्षाने आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.बीआरएस पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, बीआरएसमध्ये नाराज नाही तर अनेक नवीन चेहरे रोज सहभागी होतात, जे आमदार २-३ हजारांनी पडलेत तेदेखील पक्षाच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या महाराष्ट्रात एक सक्षम महिला या नेत्याने जर भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले त्याचसोबत पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास मुख्यमंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण होईल का असा प्रश्न पत्रकारांनी सानप यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिले. नक्कीच, देशाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करू, १०० टक्के मला विश्वास आहे. ते कोणत्याही जातीचे समीकरण न करता, जो सक्षम नेता आहे त्याला ताकद दिल्याशिवाय राहत नाहीत. पंकजाताई सक्षम आहेत, १०० टक्के त्यांना न्याय मिळेल असा विश्वासही बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला.दरम्यान, या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघून भारत राष्ट्र समिती ताकदीने महाराष्ट्रात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते त्यासाठी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ आमदार खासदार उपस्थित राहतील या विठ्ठलाचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी राज्यात बी आर एस ची सत्ता आली पाहिजे म्हणून राज्यातील 288 विधानसभा या मतदारसंघात पक्ष म्हणून लढणार आहे अशी माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली.
पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق