Hanuman Sena News

प्रियसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला घातले; थरकाप उडवणारी घटना...


मुंबई: मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आराेपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पाेलिस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.भाईंदर पूर्वेला उड्डाणपुलाखाली शिधावाटप कार्यालयासमोर गीतानगर फेज ७ आहे. येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने तसेच संशयास्पद हालचालींमुळे रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले.पोलिस उपायुक्त जयंत बजबळे हेही घटनास्थळी हाेते. सहानी याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ४ जूनला साहनी याने सरस्वतीची हत्या करून तिचे कटरने तुकडे केले. तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने काही तुकडे शिजवून ते भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याचे सांगितले जात आहे. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत. त्याने कोणत्या कारणाने व कशा प्रकारे हत्या केली? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.सहानी याचे रेशनचे दुकान असून त्याचे व सरस्वतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खटके उडत होते. सरस्वतीची हत्या करून पुरावे नष्ट करायचे असल्याने तिच्या शरीराचे असंख्य तुकडे सहानी याने कटरने केले. सरस्वती हिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना त्याला श्रद्धा वालकर हत्याकांडातून सुचल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم