Hanuman Sena News

सुभाष चंद्र बोस नगर मधील महिलां सार्वजनिक शौचालय पाण्याअभावी बंद...




मलकापूर: दि.२८/६/२०२३ बुधवार रोजी मलकापुरातील सुभाष चंद्र बोस नगर येथील समस्त नागरिकांनी मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले की मा.नगरसेवक व नगरपरिषद प्रशासना द्वारे सुभाष चंद्र बोस नगर मधील महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते.पण तिथे पाण्याची व्यवस्था मागील सात-आठ महिन्यापासून बंद आहे.त्यामुळे नगरातील महिलांना शौचालयात बाहेर उघड्यावर जावे लागत आहे. तसेच त्या शौचालयाच्या समोरील गेट सुद्धा चोरट्यांनी चोरून नेले. शौचालयातील घाणीचे साम्राज्य नगरामध्ये पसरले असून दुर्गंधी वाढली आहे. त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी प्रशासनाला विनंती आहे.सदर शौचालयामध्ये 24 तास पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.व तिथे एक कर्मचारी कायमस्वरूपी देण्यात यावा. शौचालया समोरील चोरी गेलेले गेट पुन्हा लावण्यात यावे. पाण्या अभावी नगरपालिकेचा ठिसाळ नियोजन, जनतेच्या हक्काचा पैसा खर्च करून महिला शौचालयाचा वापर होत नसल्याने शौचालयावर खर्च केलेला पैसा आज वाया जात आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संतोष बोरले, आकाश बोरले, विजय तांबे, भूषण पाटील, सागर पाटील, गणेश पारस्कर, राम तांबे,प्रेम चंदनशिव इत्यादी नगरवासी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم