मुंबई- २०१९ मध्ये पहाटे घेतलेल्या शपथे संदर्भात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता. आज या आरोपाला खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी पवार म्हणाले, माझ्या भेटीनंतर आणखीन दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ का घेतली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा होता तर मग सत्ता का गेली. असा प्रश्न उपस्थित करत सत्तेसाठी ते काही करायला तयार असतात. आणि हे समाजासमोर यावे यासाठीच नंतरची खेळी खेळली असा गौप्यस्फोटही पवार यांनी यावेळी केला, आता पवार यांच्या या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली असताना त्यांनी भूमिका का बदलली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की शरद पवार साहेबांना सत्य सांगावं लागलं आहे. पण, त्यांनी सर्व अर्धसत्यच बाहेर आलं आहे, उरलेलं सत्य मी बाहेर काढणार. एवढ आहे त्यांच्या गुगलीमुळे त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच बोल्ड केलं आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.'मी टाकलेल्या गुगलीमुळे शरद पवार यांना सत्य सांगावं लागलं आहे. पण, त्यांनी अर्धसत्य सांगितलं उरलेलं सत्य मी सांगेन, असंही फडणवीस म्हणाले 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माझी भेट घेतली होती. त्यात सरकार भरण्याची चर्चाही झाली होती. मात्र दोन दिवसांनी मी भूमिका बदलल्याचे ते म्हणत आहेत. भेटीनंतर आणखीन दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ का घेतली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा होता तर मग सत्ता का गेली. असा प्रश्न उपस्थित करत सत्तेसाठी ते काही करायला तयार असतात. आणि हे समाजा समोर यावे यासाठीच नंतरची खेळी खेळली असा गप्प स्पोटही पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय वक्तव्य करण्याऐवजी राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे गांभीर्याने बघावे असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.
"गुगली टाकून मला नव्हे पुतण्याला बोल्ड केल..." शरद पवारांनी केलेल्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق