मलकापूर: मोदी@9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत मलकापूर भारतीय जनता पार्टी तर्फे ब्राह्मण सभा मलकापूर रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये 25/6/2023 रविवारी दुपारी १ वाजता लाभार्थी संमेलन आयोजित करण्यात येऊन लाभार्थ्यांचे मनोगत जाणून घेण्यात येऊन मोदी सरकारने राबवलेल्या प्रत्येक योजनांचा लाभ झाल्याचे लाभार्थ्यांनी यावेळी उपस्थितना सांगून. 9090902024 या क्रमांकावर समर्थन देऊन मोदींच्या कार्याचा गौरव केला. लाभार्थी संमेलनात प्रमुख उपस्थिती श्री चैनसूखजी संचेती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती रक्षाताई खडसे रावेर लोकसभा मतदारसंघ खासदार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अरविंदजी लिंबावली मा कृषिमंत्री कर्नाटक यांच्या उपस्थितीत सपन्न झाला. अरविंदजी लिंबावली यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते, तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना माता आणि बालकांना मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत संरक्षण मिळाले, जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कोविड लसीचे डोस मोफत देण्यात आले, 80 कोटी लोकांना मोफत राशन वाटप, तीन कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घर मिळाली, 48 कोटी जनधन खाती उघडून गरिबांना बँकिंग प्रणालीमध्ये सामावून घेतले अश्या योजनांन बद्दल त्यांनी सर्व माहिती सांगितली.व प्रत्येक लाभार्थ्याला प्रमाणपत्र देऊन गौरविले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडीच्या सौ.अश्विनीताई काकडे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष, सौ नीलिमाताई झंवर यांनी केले. तसेच सौ उमाताई तायडे महाराष्ट राज्य पंचायत राज प्रदेश संयोजिका, बेटी बचाव बेटी पढाओ शहर अध्यक्ष अश्विनीताई देशमुख, भाजपा महामंत्री बुलढाणा जिल्हा श्री मोहनजी शर्मा, श्री शिवचन्द्र तायडे सभापती कृषिउत्पन्न बाजार समीती, मा.जि.परिषद सदस्य केदार ऐकडे,श्री संजय काजळे भाजपा तालुका अध्यक्ष, श्री मिलिंद डवले शहर अध्यक्ष, श्री विलास पाटील, रामभाऊ झांबरे, चंद्रकांत वर्मा , अरविंद किणगे,डॉ योगेश पाटणी, संतोष बोंबाटकर, नाना येशी,शुभम बोबडे, कुणाल ढोलकर,सागर बेलोकार, राजकुमार वानखेडे,देवेन टाक,योगेश काजळे,सुवर्णाताई चोपडे, शितलताई राजपूत, मेघाताई सैतवाल, भावनाताई मुंदडा, अर्चनाताई महाले सर्व लाभार्थी,सन्माननीय प्रदेश, जिल्हा, शहर, तालुका पदाधिकारी, मोर्चे आघाडी अध्यक्ष, महिला मोर्चा, बूथ शक्तिकेंद्र प्रमुख,सर्व सन्माननीय कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली.
महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत मलकापूर भारतीय जनता पार्टी तर्फे लाभार्थी संमेलन आयोजित
Hanuman Sena News
0
إرسال تعليق