Hanuman Sena News

तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर तरी बदला ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...





मुंबई - तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट, त्याचीच पुनरावृत्ती, स्क्रिप्ट रायटर तरी बदलायला सांगा. आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार. हेच बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. पानवाला, टपरीवाला, रिक्षावाला याच लोकांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. त्याच लोकांना तुम्ही हिणवता. बाळासाहेबांची एक डरकाळी फुटल्यानंतर देश स्तब्ध व्हायचा ते याच लोकांमुळे, स्वत:चा जीव धोक्यात घातला, कुटुंबाची पर्वा केली नाही. कितीतरी लोकांचे जीव शिवसेना वाढवण्यासाठी जीव गेले, अनेकांनी जेल भोगली, तुम्ही कुठे होता, किती केस झाल्या तुमच्यावर? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री यामागे कष्ट होते, बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची साथ होती. श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला, त्याने हॉस्पिटल करून द्या अशी एक गोष्ट मागितली. पण त्याला हॉस्पिटल देता आले नाही. एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. मिळेल ते काम केले, कष्ट केले, वयाच्या २० व्या वर्षी बेळगावच्या जेलमध्ये ४० दिवस होता. कितीतरी केसेस दाखल झाल्या. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी तेच भोगलेय म्हणून शिवसेना मोठी झाली, पुढे गेली असं त्यांनी सांगितले.तसेच शिवसेनाप्रमुखांचे विचार आपण पुढे नेण्याचे धाडस केले आहे. वाघाचे कातडे पांघरून लांडगे निघाले असं बोलता, पण तुमच्यासारख्या कोल्ह्यांची कुईकुई वाघ डरकाळी फोडत नाही तिथपर्यंत असते. २० तारखेला उठाव, क्रांतीदिन, स्वाभिमान दिन करायला देखील वाघाचे काळीज लागते. एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री असला तरी माझ्यात काही बदल झाला नाही. जसा आहे तसाच आहे. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो सरकार पडणार पडणार असे वारंवार बोलत होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता हे सरकार पडणार नाही. हे फिक्स झाल्यामुळे तुमचा खोटारडेपणाला जनता साथ देणार नाही शेतकऱ्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये चांगल्या गाडीने फिरू नये मी शेतकरी म्हणून शेती करतो तुम्ही सरकार चालवायचे सोडून गाडी चालवत होतात मी गाडीतून जेव्हा जात होतो तेव्हा फाईली घेऊन जातो रस्त्यात काम करतो अडीच वर्षात जितक्या सह्या झाल्या नाहीत तितक्या एक दिवसात करतो अगोदरचे मुख्यमंत्री पेन ठेवत नव्हते माझ्याकडे दोन पेन आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे अडीच वर्षात दोन कोटी वाटले पण मी आल्यानंतर एका वर्षात 75 कोटी वाटले आगामी निवडणुका शिवसेना भाजपा म्हणून लढवणार गाव तिथे शाखा घर तिथं शिवसैनिक झाला पाहिजे शाखेतला माणूस घरात गेला पाहिजे घरातला माणूस शाखेत आला पाहिजे हे बाळासाहेबांनी सांगितले मुंबईत जे कोविड काळात घोटाळे झाले तुम्ही पैसे बनवत होता याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल.आगामी सर्व निवडणुका शिवसेना भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकार काम करतय शासनाचे आपल्या दारी प्रकल्प सुरू आहेत आपण त्यामधला दुवा म्हणून लोकांपर्यंत पोहोचा एका छता खाली सर्व दाखले मिळत आहेत. हे लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले

Post a Comment

أحدث أقدم