पुणे: कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या महिलेची नाव आहे. त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत. यासंदर्भात पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी तक्रार दिली आहे.आषाढी वारी निमित्त कासुर्डी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस नाईक नितीन कोहक हे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. दरम्यान वंदना मोहिते या मोटारने त्या ठिकाणी आल्या. यावेळी पुण्याकडे जाण्यासाठी त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. वंदना मोहिते यांनी नितीन कोहक यांच्या कानाखालीदेखील मारली. त्यानंतर गाडीतून खाली उतरत त्यांनी बॅरिकेट बाजूला केले आणि निघून गेल्या. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणण्या प्रकरणी डॉ.वंदना मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरून त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق