मोताळा : शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २७ मे रोजी रिधोरा जहांगीर शिवारात घडली. याप्रकरणी तक्रारीवरून दोन्ही गटांतील सात जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील रिधोरा जहांगीर येथील दिगंबर चांगो मानकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची चार एकर शेती असून, तीन भाऊ आहेत. त्यापैकी एक भाऊ गजानन मानकर हा मृत झालेला आहे, तर त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला आहे. त्याची मुलगी सुजाता ही २१ वर्षांची असून, तिचा सुनील घाटे यांचा मुलगा पवन घाटे याच्यासोबत साखरपुडा झालेला आहे. सुजाताच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने गावशिवारातील गट क्र. ७६ मधील साडेसात एकर शेतीची ती वारस आहे. आजपर्यंत ती शेती फिर्यादी मानकर यांनी वहिती करून त्यातून आलेले पैसे हे सुजाताच्या पालन- पोषणासाठी खर्च केले.दरम्यान, शनिवारी, दि.२७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काही लोक सुजाताच्या नावे असलेल्या शेतात नांगरटी करीत असल्याची माहिती फिर्यादीस मिळाली. त्यावरून फिर्यादी आणि त्याचा भाऊ, असे दोघे शेतात गेले असता तुम्ही आमच्या शेतात नांगरटी का करीत आहात, असे विचारले असता सुनील घाटे, पवन घाटे, विजय धांडे, निंबाजी गायकवाड यांनी लोखंडी रॉड, काठी तथा चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातील भोरटेक येथील निंबाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते साक्षीदार यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करीत होते.दरम्यान, त्याठिकाणी रिधोरा येथील डिगंबर मानकर, विकास मानकर आणि कमलाकर मानकर हे तिघे आले, तसेच नांगरटी का करता असे म्हणून वाद घातला, तसेच जातिवाचक शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी दिगंबर मानकर, विकास मानकर आणि कमलाकर मानकर या तिघाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ हे करीत आहेत.
शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق