खामगाव: माहेरहून पाच लाख रूपये आणण्याचा तगादा लावत एका ४६ वर्षीय विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर हाकलणार्या सासरच्या मंडळी विरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना खामगाव शहरातील सिव्हील लाईन भागात उघडकीस आली.सिव्हील लाईन भागातील ज्योती मुकेश गणवानी या विवाहितेने शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचा विवाह मुकेश गणवानी यांच्यासोबत झाला आहे. विवाहानंतर सुरूवातीचे काही दिवस सासरच्या मंडळीने चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर वडिलांनी हुंडा कमी दिला म्हणून पाच लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला. लग्नातील मानापमानावरून छळ करीत, पैशांसाठी घराबाहेर हाकल्याचे पोलीसांत नमूद केले.या तक्रारीवरून पोलीसांनी सासरे रामचंद गंगाराम गणवानी, सासू कौशल्या रामचंद गणवानी, दिर रोषन गणवाणी, नणंद राखी श्याम बनवारी रा. जालना, नणंद नंदा जीवनालाल मोहनानी रा. अंमळनेर यांच्याविरोधात भादंवि कलम ४९८ १९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
पाच लाखासाठी विवाहितेला घराबाहेर काढले; सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق