नृत्यांगना गौतमी पाटील हिला संरक्षण देण्याबाबत केलेल्या विधानाबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे, असे म्हटले होते. मात्र त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची "कला" मी बघितली. आता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असं मला वाटतं, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिले पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळाले पाहिजे. मी या मताचा आहे, असे संभाजीराजे छत्रपती य़ांनी म्हटले होते. त्यानंतर त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आज संभाजीराजेंनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, काल एका पत्रकाराने एका महिलेचा "कलाकार" असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे आहे, असे समजून मी कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. असे मी बोलून गेलो. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची "कला" मी बघितली. आता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असे मला वाटते, असे संभाजी राजे छत्रपतींनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या गौतमी पाटील हिला संरक्षण नको संभाजी राजेंचा स्पष्टीकरण...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق