Hanuman Sena News

दोन हजाराची नोट घेण्यास मनाई ग्राहक त्रस्त...

मलकापूर:  तालुक्यात किराणा दुकान पेट्रोल पंपा सह सर्वच ठिकाणी दोन हजाराच्या नोटा घेण्यात येत नाहीत त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत सर्व ठिकाणी दोन हजारांच्या नोटा चलनात चालतील असे स्पष्ट निर्देश आरबीआयने दिले असले तरी अनेक ठिकाणी दोन हजाराच्या नोटा नाकारल्या जात आहेत. अनेक महिन्यापासून एटीएम मधून दोन हजारांच्या नोटा मिळत नसल्याने अनेकांकडे नोट नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडील नोटा घेण्यास नकार देण्यात येत आहे. मलकापूर शहरात दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन ग्राहक दुकानांमध्ये गेल्यावर त्या घेण्यात येत नाहीत आम्हाला बँकेत जाऊन बदलाव्या लागतात तसेच एवढे पैसे कुठून आले याबाबत चौकशी होऊ शकते अशी भीती दुकानदारांना आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात नाही.शहरातील मुख्य बाजारातील किराणा दुकानात दोन हजार रुपयाची नोट दिली असता मालकाने नोट घेण्यास नकार दिला. आम्हाला या नोटा बँकेत जाऊन बदलाव्या लागणार आहेत त्यामुळे घेत नसल्याने सांगण्यात आले .तसेच मेडिकल मध्ये सुद्धा दोन हजाराची नोट दिली असता ती घेण्यास नकार देण्यात आला अन्य कुणीही नोट घेत नसल्याने दररोज बँकेत जाऊन बदलावी लागते त्यातच वेळ खर्च होतो त्यामुळे नोट घेण्यास मेडिकल मध्ये ही नकार देण्यात आला .पेट्रोल पंपावरही दोन हजाराची नोट घेण्यात येत नाही तरी दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत चलनात आहे या नोटा बँकेत 30 सप्टेंबर पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.मात्र आतापासूनच नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم