मलकापूर: कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुढील पाच वर्षाचे कामकाज पाहण्यासाठी सभापती व उपसभापती यांची निवड करण्याकरिता नवनिर्वाचित संचालक मंडळाची प्रथम सभा 20 मे रोजी सकाळी बाजार समिती कार्यालयीन सभागृहात अधिकारी महेश कृपलानी यांच्या उपस्थितीत पार पडली दरम्यान सभापतीपती शिवचंद्र तायडे तर उपसभापती पदी नागोराव राणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक साहेबराव पाटील, सुभाषराव पाटील, श्रीकृष्ण खापोटे, भगवान चोपडे, विजय साठे, ज्ञानदेव वाघोदे, अमोल शिरसाट,संजय काजळे, प्रीती नारखेडे, नंदाबाई पाटील, योगेश पाटील, मधुकर फासे,सुनील अग्रवाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती या निवडीनंतर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चेनसुखजी संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा संचालक मंडळ व उपस्थितीत भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन येथे सत्कार करण्यात आला.जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराचा विकास करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचून निवडणुकीतील वचननाम्याची पूर्तता करणार असल्याची गवाही नवनिर्वाचित सभापती शिवचंद्र तायडे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे, विजयराव जाधव, विलासराव पाटील, मोहनजी शर्मा, जिल्हा परिषद सदस्य केदार ऐकडे, भगवान पाटील, भाजपा शहराध्यक्ष मिलिंद डवले, राजेंद्र खराडे, संदीप पाटील, राजेंद्र कोचर, सुरेश संचेती ,रामभाऊ झांबरे, अमृत बोंबाटकर, पंकज मुंदडा, जयदीप पाटील ,बाजार समितीचे सचिव राधेश्याम शर्मा आदींची उपस्थिती होती.
बाजार समिती सभापतीपदी शिवाभाऊ तायडे तर उपसभापती नागोराव राणे बिनविरोध...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق