Hanuman Sena News

विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू, उघड्या विद्युत रोहित्राने केला घात...



सिंदखेड राजा : ग्रामीण भागातच नव्हे, शहराच्या ठिकाणीही अनेक विद्युत रोहित्र उघडे दिसून येतात. अशाच एका उघड्या विद्युत रोहित्राने घात केला.तालुक्यातील पिंपरखेड येथील अतिष नंदकिशोर राठोड (वय ३१) यांचा उघड्या असलेल्या विद्युत रोहित्राचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.अतिष राठोड हे आपल्या जनावरांना घराकडे घेऊन येत असताना बाजूलाच असलेल्या उघड्या डीपीचा त्यांना शॉक लागला. जबर शॉक लागल्याने अतिष राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांचा परिवार अडचणीत आला आहे.दरम्यान, या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर मुख्य चौकातील विद्युत रोहित्र उघडे आहेत. अनेकांचे वायर खाली आलेले दिसून येतात. उघडे असेलेले हे विद्युत रोहित्र जीवघेणे ठरत आहेत. पिंपरखेड येथील युवकाचा उघड्या विद्युत रोहित्रामुळे मृत्यू झाला असून, नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم