Hanuman Sena News

पोलीस जमदाराचा प्रामाणिकपणा सापडलेले अडीच लाखांची सोन्याची पोत केली परत...





बुलढाणा : सापडलेली 2 लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम रावे यांनी महिलेस परत करून प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला.पोलीस दलातील मोटार वाहन विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम रावे 2 मे रोजी जाफराबाद येथे लग्न निमित्त गेले होते. मंगल कार्यालय बाहेर रात्री 11 वाजता त्यांना 2 लाख 40 हजार रुपये किमतीची सोन्याची एक पोत सापडली. या दागिन्याबद्दल त्यांनी मंगल कार्यालयात माहिती दिली. विचारपूस केल्यानंतर पोत पदमिनी मोतेकर पाळणाघर बुलढाणा यांची असल्याचे समजले पुरुषोत्तम रावे यांनी महिलेस परत केली

Post a Comment

أحدث أقدم