मलकापूर पांग्रा : येथील ३० वर्षीय विवाहित महिला दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात साखरखेर्डा पोलिसांनी ५ मे रोजी महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली असून, पोलिस तपास सुरू आहे.शिल्पा सुरेश काकडे (वय ३०) या ३ मे रोजी रात्री १ वाजेनंतर घर सोडून निघून गेल्या. रंग काळा सावळा, उंची साडेचार फूट, अंगात निळ्या व लाल रंगाची साडी आहे. या संदर्भात सुरेश फकिरा काकडे (वय ३६) यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिल्पा काकडे या ३ मे रोजी रात्री १ वाजेपर्यंत घरी होत्या, परंतु सकाळी सुरेश काकडे यांना शिल्पा घरात कुठेही आढळून आल्या नाहीत. दरम्यान, नातेवाइकांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली असता, त्या सापडल्या नाही. अखेर साखरखेर्डा पोलिस स्टेशनला ५ मे रोजी महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जामदार निवृत्ती पोफळे हे करीत आहेत.
30 वर्षीय विवाहित महिला दोन दिवसांपासून बेपत्ता...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق