Hanuman Sena News

चिखलीनजीक पुलावरुन ट्रॅव्हल बस घसरली,1 महीला ठार 17 प्रवासी जखमी...

 चिखली: जळगाव जामाेद येथून पुण्याकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस(यूपी 78 एफ एन 4662) मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उत्रादपेठ येथील पैनगंगा नदीवरील पुलावरून घसरल्याने झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली असून 17 प्रवासी जखमी झाले आहेत बाबा ट्रॅव्हल बस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामाेद येथून चिखलीमार्गे पुण्याकडे निघाली असता रात्री हा अपघात घडला.पैनगंगा नदीला पाणी नसल्याने व पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून कलंडलेल्या बसमधील प्रवाशांना गंभीर इजा झाली नाही; मात्र १० प्रवाशी जखमी झाले असून, त्यांनी अपघातानंतर मिळेल त्या वाहनाने परिसरातील अमडापूर, चिखली येथील शासकीय तसेच खासगी दवाखान्यात धाव घेतली. दरम्यान, वार्ता कळताच अमडापूर व चिखली पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावकऱ्यांनीही तातडीने धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात पाेहाेचविण्यासाठी मदत केली. रात्रीचा गडद अंधार असल्याने मदत कार्यास अडथळा निर्माण झाला होता. यातील मृत महिलेचे नाव संगीता ठाकरे असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Post a Comment

أحدث أقدم