अयोध्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामलल्लांचं दर्शन झाल्यानंतर अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यासाठी काल (शनिवारी) रात्री लखनौ विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर आज (९ एप्रिल) त्यांनी अयोध्येत रामलल्लांचं दर्शन घेतलं. तसेच या दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांना आमच्या या अयोध्या दौऱ्याची अॅलर्जी होती, अनेकांना या दोऱ्यामुळे त्रासही झाला. त्यांनी टीका केली. परंतु अयोध्या हा आमच्या आस्थेचा विषय आहे, हा आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दौऱ्याचा काहींना त्रास झाला, कारण त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हे लोक हिंदू धर्माबद्दल चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटतं की, हिंदूत्व जर सर्वांच्या घराघरात, मनामनात पोहोचलं तर त्यांची राजकीय दुकानं बंद होतील. या भितीमुळे हे लोक हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आले आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले की 2014 मध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही सरकार बनवलं 2019 ला ही तेच करणार होतो परंतु स्वार्थ आणि खुर्चीच्या लालसे पोटी त्यांनी चुकीचा पाऊल उचललं परंतु आठ महिन्यापूर्वी आम्ही ती चूक सुधारली हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर या लोकांना लांब ठेवलं त्यांच्यासोबतच त्यांनी सरकार बनवलं होतं बाळासाहेबांच्या विचारांची दगा केला परंतु आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन ती चूक सुधारली त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्य बाण चिन्ह ही मिळालं आणि शिवसेना हे नावही मिळालं.
काहींना हिंदुत्वाची अॅलर्जी, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق