मलकापूर : शहरातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पर्यावरण पूरक सायकल रॅली, गोमाता पूजन, विविध देखाव्यांसह भव्य शोभायात्रा सोबतच विविध कार्यक्रम करीत साजरा करण्यात आले.भगवान विष्णूचे सहावे अवतार मानल्या जाणारे भगवान श्री परशुराम यांच्या जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येतो. व यानिमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शहरात विविध स्पर्धा व उपक्रम राबवित मोठ्या हर्ष उत्साहात जन्म सोहळा साजरा करण्यात आला. दिनांक 16 एप्रिल रोजी "भगवान परशुराम आमची आराध्य दैवत" या विषयावर निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. सोबतच भव्य मैदानी क्रिकेट स्पर्धा चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. दि 22 यप्रील 23 रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजता गो मातेचे पुजन करून चारा वितरण करण्यात आला. त्यानंतर १० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून पर्यावरणपुरक व उत्तम स्वास्थ करीता जनजागृती संदेश देत, सायकल रॅली काढण्यात आली. तर दुपारी १२ वाजता जन्म उत्सव महाआरती करण्यात येऊन समाज बांधवांच्या वतीने भगवान परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आले.तर आज २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक चांडक विद्यालय येथून भगवान परशुराम व प्रभू श्रीराम यांच्या विविध देखाव्यांसह, सांस्कृती पद्धतिने भजन, कीर्तनसह भगवान परशुराम व प्रभू श्रीराम की जय अशा गगनभेदी घोषणा देत राजराजेश्वर भगवान परशुराम व प्रभु श्री राम यांच्या प्रतिमेसह शहरातील मुख्य मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्राचे आकर्षण भगवान परशुराम यांचे 25 फुट ऊंच तैलचित्राचे अनावरण ठरले.या शोभायात्रा मार्गावर सडा- सारवण, रांगोळ्या काढून तसेच पुष्पवर्षाव करीत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तर काहींकडून शोभायात्रेत सहभागी असलेल्यांकरीता शीतपेयाचे वितरण करण्यात आले. या दरम्यान विविध राजकीय, सामाजिक, सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी शोभायात्रेत आपला सहभाग नोंदविला. तर या दरम्यान भगवान परशुराम जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.या भव्य अशा कार्यक्रमांच्या आयोजनात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बहुभाषिक ब्राम्हण समाजातील महिला, पुरूष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق