Hanuman Sena News

शासकीय अभ्यासिका इमारतीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाव द्या-बहुजन उद्धारक सेवा समिती






मलकापूर: बहुजन उद्धारक सेवा समिती मलकापूर यांच्यातर्फे नगरपालिका मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले यात नमूद केल्याप्रमाणे मलकापूर शहरातील 40 बिघा परिसरातील शासकीय अभ्यासिका इमारत निर्माण होत आहे या इमारतीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात यावे. भविष्यात विद्यार्थी व वाचक नागरिकांसाठी प्रशस्त अभ्यासिका तयार होण्याचे नियोजन आहे ज्यातून भावी काळात सुजाण व जागरूक नागरिक घडवण्याबरोबरच कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी सुद्धा निर्माण होणार आहेत अशा या पवित्र व समाज उपयोगी वस्तूला नाव देखील तितकेच साजेशे व शोभनीय असावे म्हणून अशी मागणी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आले जेणेकरून तेथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सावित्रीबाईंच्या कष्टांची त्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव निर्माण होऊन भविष्याच्या दृष्टीने अभ्यासिका करताना प्रेरणा मिळेल यावेळी संजय उमाळे, अनिल बगाडे, संतोष भाऊ बोंबटकार नितीन भुजबळ, श्याम वानखेडे सर, रविभाऊ वानखेडे, अमोल राऊत,संजय बावस्कर ,मंगेश सातव, सागर सातव, किशोर राऊत, दीपक बावस्कर ,वैभव भोपळे ,तानाजी तायडे ,अभिजीत तायडे, मारुती तायडे, सुपेश बोंबटकार ई. समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم