Hanuman Sena News

सावरकर दाढीच्या विरोधात होते; एकनाथ शिंदे दाढी काढून फिरणार का! - संजय राऊत
















मंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंद गटातर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आजपासून या यात्रेला प्रारंभ होणा असून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्याचं काम या यात्रेतून करण्यात येईल. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज वज्रमूठ सभाही संभाजीनगर येथे होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. सावरकर गौरव यात्रेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला.शिवसेना नेते संजय राऊत  यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मिंधे गटाला सावरकरांबद्दल काय माहिती आहे, त्यांच्या साहित्याबद्दल काय माहिती आहे. सावरकरांचा विचार आणि हिंदुत्त्व काय माहिती आहे, असे म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केले. तसेच, सावरकर हे दाढीविरोधी होते, त्यांचे फोटो पाहा, कुठल्याही फोटोत ते दाढी वाढवलेले दिसणार नाहीत. मग, सावरकर गौरव यात्रा काढणाऱ्यांना हे जमणार आहे का? एकनाथ शिंदे दाढी कापून फिरतील का?, असा सवाल शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. मग कुणीही असो. मग आता डॉ. मिंधे सावरकरांच्या यात्रेत गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का? एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे.मिंधे गटाने अगोदर सावरकराचे पारायण करावे माझी जन्मठेप, सहा सोनेरी पान, इतर विज्ञानवादी लिखाण या सगळ्या लिखाणांचं डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या चाळीस लोकांनी पारायण करावे आणि मग त्यांच्या विचारांसाठी सावरकर यात्रा काढावी भाजपालाही सावरकर विचारांच पारायण करायची गरज आहे तुम्ही सावरकर वादी असू शकत नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले


Post a Comment

أحدث أقدم