मलकापूर : क्रिकेट खेळताना बॅट तुटल्याने दोन अल्पवयीन मुलांत वाद झाल्याची घटना येथील रामदेवबाबा नगरात रविवारी सायंकाळी घडली. त्यात एकाने चक्क पोटात चाकू खुपसल्याने दुसऱ्याचा सोमवारी बुलढाण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.शहरातील रामदेवबाबा नगरात क्रिकेट खेळताना दोन अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्यात एकाची बॅट तुटली. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. त्यामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकाने घरातून आणलेला चाकू यश कैलास चव्हाण (१६) याच्या पोटात खुपसला. रागाच्या भरात त्याने वार केले. त्यामुळे यश गंभीर जखमी झाला. या घटनेत गंभीर जखमीला आधी स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तब्येत खालावल्याने त्याला बुलढाणा येथे हलविण्यात आले. रात्रभर त्याच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले.सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास यश चव्हाण या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती कळताच रामदेवबाबा नगरात एकच खळबळ उडाली. पोलिस प्रशासनाने तत्काळ या घटनेतील विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले उशिरापर्यंत पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कारवाई सुरू होती.
दोन अल्पवयीन मुलांचा वाद : बँट तुटल्याच्या कारणाने खुपसला चाकू
Hanuman Sena News
0
إرسال تعليق