Hanuman Sena News

संजय राठोड यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिराचे भूमिपूजन...






मोताळा: तालुक्यातील नळकुंड या गावात संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले मंदीराकरिता लोकवर्गणीतून तब्बल 40 लाखांचा निधी उभारणार्‍या ग्रामस्थांचे राठोड यांनी विशेष कौतुक केले. या गावात अजून साधी एसटी बस पोहोचली नाही त्या मोताळा तालुक्यातील नळकुंड गावात शनिवारी चक्क हेलिकॉप्टर उतरले.बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन व सांस्कृतिक प्रबोधन मेळावा नळकुंड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी संजय राठोड यांच्यासह खासदार प्रतापराव जाधव ,आमदार संजय गायकवाड, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड उपस्थित होते संजय राठोड यांनी आपल्या संकटाच्या काळात समाज पाठीशी उभा राहिल्याचा उल्लेख करून समाजाच्या ऋणात राहण्याची भावनिक ग्वाही दिली. खासदार प्रतापराव जाधव यांनी बंजारा समाज हा कष्टाळू व स्वाभिमानी समाज असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील सर्व बंजारा तांडांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले. रायसिंग महाराज यांनी संत सेवालाल महाराजांचा सत्यतेचा संदेश तंतोतंत पाळण्याचे आव्हान समाज बांधवांना केले.

Post a Comment

أحدث أقدم