मलकापूर: जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती 4 एप्रिल रोजी मलकापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध संघटना पक्ष व समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले. शहरातील महावीर स्थित श्री 1008 जैन मंदिर येथे मंगळवारी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला.स्थानकवासी जैन ,स्थानिक दिगंबर जैन मंदिर व दिगंबर जैन संस्था तथा सकल दिगंबर जैन समाज मलकापूर यांच्यावतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकाळी सात वाजता मंदिरातून भगवान महावीर स्वामींचा सकाळीच पालखीचा रथ निघाला प्रतिमेची रथ पालखीतून शोभायात्रा काढण्यात आली. पांढरा कुर्ता परिधान केलेले पुरुष आणि केसरी साड्या घातलेल्या भगिनींनी भगवान महावीर यांच्या नावाचा जयघोष केला. दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी 9 ते 11 वाजता ध्वजारोहण, भगवान महावीर यांच्या नवीन मूर्तीचा अभिषेक ,शांतीधारा, विधान पूजा व मंगल पाळणा हे कार्यक्रम पार पाडले सकाळी 9 ते 12 मंदिर परिसरात वेगवेगळे कार्यक्रम पार पडले रथ पालखी जुन्या गावातील जैन मंदिरातून मुख्य चौकात आनंद दरबार येथे आली यावेळी जैन समाजाच्या सर्वच माता भगिनींनी महाप्रसादाचे वितरण झाले. समाजाचे संघपती भरत भाई दंड, उत्तमचंद आबाड तसेच भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष संदीप नहार, आयोजक मंडळाचे सजीव सचिव विजय गोठी, अंकित कोरडिया मनोज जटाले यांनी आभार मानले
महावीर जयंती निमित्त मलकापूर शहरातून भव्य शोभायात्रा ! श्री महावीर जन्म कल्याणक उत्साहात साजरा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق