बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातल्या दहा पैकी पाच कृषी उत्पन्न बाजार समितीचे काल 28 एप्रिल ला मतदान झाले रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालात जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारण्याचे स्पष्ट आहे. पाच पैकी तीन बाजार समित्यावर महाविकास आघाडीने बाजी मारली. मलकापुरात चैनसुखजी संचेती यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळविला तर मेहकरच्या चुरशीच्या लढतीनंतर खासदार जाधव यांच्या भूमिपुत्र पॅनलने विजय मिळविला. मेहकारात खासदार जाधव यांचा भूमिपुत्र पॅनलला 11 तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळाल्या मतमोजणी सुरू असताना विजयी झाल्याचे समजून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला 50 खोके एकदम ओके चे नारे दिल्या गेले त्यामुळे वातावरण टाइट झाले अगदी निकालानंतर मात्र खासदार जाधवांनी त्यांचा गड वाचवला मात्र यावेळी त्यांना मोठा संघर्षाचा सामना करावा लागला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची ठरली महाविकास आघाडीची एकजूट इथे आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपा पॅनलवर वरचढ ठरली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीला 12 तर शिंदेंची शिवसेना आणि भाजपाला 6 जागा मिळाल्या त्यामुळे पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर बुधवंत राज पाहायला मिळणार आहे. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या सहकारातील वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामार्फत झाले. 18 पैकी 15 जागावर महाविकास आघाडीचे पॅनल विजय ठरले तर 3 जागा भाजप सेना युतीला मिळाल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार सानंदा यांनी त्यांचा गड शाबूत ठेवला आ.आकाश फुंडकर यांनी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मात्र यश मिळाले नाही 18 पैकी पंधरा जागावर महाविकास आघाडी तर 3 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सत्तेपासून दूर असलेल्या सानंदांना दिलासा मिळाला आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकतर्फी झाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता उलथवून लावत माजी आ.चेनसुखजी संचेती यांनी भाजपा शिवसेनेचा झेंडा फडकवला पंधरा वर्षापासून इथल्या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेसचे वर्चस्व होते. ते आता संपुष्टात आले आहे.भाजपा शिवसेनेच्या पॅनलला 17 तर विरोधकांना 1 जागा मिळाल्या.
पाच पैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق