Hanuman Sena News

भाजपा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा...





मलकापूर: जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या भाजपाचा 44 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री मोहनजी शर्मा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते भाजपा कार्यालय चाळीस बिघा येथे ध्वजारोहण करण्यात आला यावेळी भाजपा कार्यालयात ध्वजारोहण नंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्बोधनाचे प्रसारण करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री मोहनजी शर्मा यांनी मार्गदर्शन केले स्थापना दिवस निमित्त पुन्हा एकदा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची सरकार निवडून आणण्याचा संकल्प केला. तसेच प्रत्येक बूथवर कमीत कमी पाच ठिकाणी भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ रंगविणे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम संपूर्णपणे मलकापूर तालुक्यामध्ये राबवायचा आहे यावेळी भाजपाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी तसेच युवा मोर्चा पदाधिकारी, विद्यार्थी आघाडी, जिल्हा मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्ती केंद्र व बूथ प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم