जळगाव : उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांचे नाव वापरू नका. हे अनेक वेळेस बोलले असून त्यामुळे त्या गोष्टीला किती महत्व द्यावे, हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. उद्धव ठाकरे यांच्या सोबत आपण ३५ वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्द प्रयोग आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे आम्ही रक्त पिणारे ढेकुण नसून रक्त देणारे शिवसैनिक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी जळगावात प्रत्युत्तर दिले आहे.पाचोरा येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब हे उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत, पण बाळासाहेब या देशाची प्रॉपर्टी आहे. तमाम जनतेसाठी आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.मुस्लीम युवकांचा शिवसेनेत प्रवेश यावेळी जळगाव महानगर, ममुराबाद, नशिराबाद व मेहरूण परिसरातील मुस्लीम व इतर युवक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शेख इकबाल शेख सलीम यांची जळगाव महानगरच्या उपशहर प्रमुखपदी निवड होऊन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नगरसेवक मनोज चौधरी यांनी केले तर आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा यांनी मानले.
आम्ही रक्त पिणारे नसून रक्त देणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक - गुलाबराव पाटील
Hanuman Sena News
0
إرسال تعليق