मलकापूर: शहरातील वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपी जवळ व विद्युत खांबांवर असलेल्या फ्युज पेट्या गेल्या कित्येक दिवसांपासून उघड्या अवस्थेत असल्याने एखादवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा संभाव्य धोका लक्षात घेता उघड्या अवस्थेत असलेल्या फ्युज पेट्यांना तातडीने फाटके बसविण्यात यावे व नादुरूस्त असलेल्या दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांच्याकडे आज १८ एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरामध्ये वीज वितरण कंपनीच्या विविध भागात विद्युत डिप्या लावण्यात आलेल्या आहेत. सदर विद्युत डिप्यांच्या ठिकाणी व विद्युत खांबांवर असलेल्या फ्युज पेट्यांची अवस्था ही आजरोजी अत्यंत दयनीय स्वरूपी झालेली असून नांदुरा रोड, बुलढाणा रोड, उपजिल्हा रूग्णालय रोड यासह शहरातील इतर विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्युज पेट्यांना फाटकेच उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी उघडे असलेले हे फ्युज एखादवेळी मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात.शहरातील अनेक भागातील डिप्यांच्या ठिकाणी असलेल्या फ्युज पेट्या ह्या हात पुरेल अशाा स्थितीत लावण्यात आलेल्या असून त्यांची फाटके ही गहाळ झालेली आहेत. उघड्या पडलेल्या या फ्युज पेट्यांजवळ एखादवेळी मुके जनावर जाऊन त्यास आपला जीव गमवावा लागू शकतो. अथवा एखादवेळी लहान मुले ही खेळत त्याठिकाणी गेली असता एखादा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा वीज वितरण कंपनीने मलकापूर शहरातील नादुरूस्त असलेल्या फ्युज पेट्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अशा उघड्या फ्युज पेट्यांना चपलांचा हार घालून निषेध नोंदविण्यात येईल. असा इशाराही अजय टप यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.
मलकापूर महावितरणचा भोंगळ कारभार ; उघड्या अवस्थेतील फ्युज पेट्यांना तातडीने फाटके बसवण्यात यावी- अजय टप
Hanuman Sena News
0
إرسال تعليق