Hanuman Sena News

आई वरून शिवी दिल्याचा राग आल्याने तरुणाने केला खून..








साखरखेर्डा: 13 एप्रिलच्या रात्री साखर खेडा येथे 17 वर्षे तरुणाचा खून करण्यात आला आई वरून शिवी दिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे. शेख आदिल असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून प्रशांत योगेंद्र गवई असे आरोपीचे नाव आहे . 13 एप्रिलच्या रात्री दोघात वाद झाला. या वादातून शेख आदील याने प्रशांतला आई वरून शिवी दिली. याचा राग अनावर झाल्याने सदर प्रकरण हाणामारीवर पोहोचले. प्रशांत ने आदिलचा गळा आणि नाक दाबल्याने आदील जागेवर बेशुद्ध पडला. यावेळी उपस्थितांनी आदिलला आधी साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. रात्री उशिरा डॉक्टरांनी आदिल याला मृत घोषित केले. आदिलचा भाऊ सोहेल याने दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून तपास ठाणेदार नंदकिशोर काळे करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم