मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे यांची बाजू माध्यमांमध्ये भक्कम आणि आक्रमकपणे मांडत असतात. त्यात संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारे प्रकरण समोर आले. तू दिल्लीत भेट तुला एके ४७ ने उडवतो. तुझा मुसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स अशी धमकी संजय राऊतांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षातीलन नेत्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. त्यात, आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी उडी घेतलीय.१९९३ च्या बॉम्बस्फोटात सामील असलेल्या लोकांशी जमीन व्यवहारात अटक झाल्यानंतर दाऊद इब्राहिमचा फ्रंट मॅन नवाब मलिक याचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास तुमची काय असमर्थता होती? नैतिकदृष्ट्या ज्येष्ठ नेत्या म्हणून तुम्ही अपयशी ठरला आहात, असे म्हणत मोहित कंबोज यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय.खासदार संजय राऊत यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही आपण बोलणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले तसेच झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असे सुळे यांनी म्हटले त्यावरून आता प्रत्युत्तर देण्यात येत आहे देवेंद्र फडणवीसांचे जवळीक असलेले कार्यकर्ता मोहित कंबोज यांनी सुप्रिया सुळेंना पलटवार केला त्यात कंबोज आणि महावीर विकास आघाडीच्या सरकारच्या काळात नवाब मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही असा प्रश्न सुप्रिया सुळेंवर उपस्थित केला या धमकी बाबत कोणाचीही चेष्टा केली नाही मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे मी गृहमंत्री पदावर राहिलो नाही तर बरे होईल असे अनेकांना वाटते पण मी गृहमंत्री राहणार आहे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा कारभार दिला आहे जे कोणी चुकीचे काम करील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही गृहमंत्री म्हणून मी यापूर्वी पाच वर्षे कारभार सांभाळला आहे आताही ते बेकायदेशीर कामे करतील त्यांना सोडणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळे यांच्या टिकीला प्रतिउत्तरही दिलं
मोहित कंबोज यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, फडणवीसांवरील टीकेला उत्तर...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق