जळगाव जामोद (जि. बुलढाणा): महाराष्ट्राचे अत्यंत समर्पक व यथार्थ वर्णन विनोदी साहित्याचे जनक तथा ज्येष्ठ नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गीतातून केले. हे महाराष्ट्र गीत १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही या साहित्य सम्राटाच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर सरकार बदलल्याने ती थंडबस्त्यात आहे.जळगाव शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयास १९७१ ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत श्रीपाद कृष्णांचे नाव दिले गेले. एवढीच स्मृती जळगावात आहे.आयुष्याची महत्त्वपूर्ण पंधरा वर्षे जळगावात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे सन १९१८मध्ये खामगाववरून जळगाव जामोद येथे आले. आयुष्याची शेवटची पंधरा वर्षे त्यांनी जळगावच्या भूमीत घालविली. या काळात त्यांनी प्रचंड साहित्य लेखन करून ‘विनोदाचार्य’ ही उपाधी मिळविली. सन १९३३ पर्यंत त्यांचे वास्तव्य जळगावात होते. प्रकृती बिघडल्याने ते पुणे येथे गेले आणि १ जून १९३४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.महाराष्ट्र गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे महाराष्ट्र गीतात त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीचे, मानवी स्वभावाचे, पराक्रम गाजविणाऱ्या मराठ्यांचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यामुळेच ९७ वर्षांनंतरही मोठ्या दिमाखाने हे गीत गायले जाते. परंतु, हे गीत ज्या भूमीत लिहिले गेले, त्या जळगावची साधी आठवणसुद्धा राज्यकर्त्यांना होत नाही.
..या भूमीत लिहिले गेले "महाराष्ट्र गीत"; गीताच्या रचनेला झाली 97 वर्ष ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق