Hanuman Sena News

अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण









मुंबई: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण 14 एप्रिल 2023 रोजी तेलंगाना राज्याची राजधानी हैदराबाद येथे होणार आहे या भव्य पुतळ्याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री के. सी .राव हे देखील उपस्थितीत राहणार आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे भव्य स्मारक हे ठरेल यांची उंची 125 फुट असून याचे सर्व काम पूर्ण झाले आहे 11.4 अकरा एकरात दीडशे कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم