चिखली : अंचरवाडी येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 29 मार्च सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली .कृष्णा दगडू काशीकर (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. कृष्णा काशीकर अल्पभूधारक शेतकरी होते. गावात त्यांचे दाढी कटींगचे दुकान होते.त्यांच्यावर खाजगी फायनान्सचे कर्ज होते गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत असलेली नापिकी त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यातून ते दारूच्या आहारी गेले होते मार्च महिना अखेर असल्याने फायनान्स कंपनीचे कर्मचारी कर्ज वसुलीसाठी त्यांच्या घरी सातत्याने चकरा मारत होते .त्यांच्या घरावर फायनान्स कंपनीने नाव लिहिलेले होते त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते .त्यांची पत्नी दोन दिवसापूर्वी माहेरी गेली होती त्यामुळे घरी ते एकटेच होते.29 मार्च सकाळी कटिंग दाढी करायला आलेल्या एकाने त्यांना आवाज दिला मात्र तरीही कृष्णा काशीकर घरातून बाहेर आले नाहीत, त्यावेळी घरात जाऊन पाहिले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात पंचनामा करण्यासाठी पाठवण्यात आला पुढील तपास पोहेकॉ कैलास उगले करीत आहेत.
मार्च महिना अखेरस ऐकाचा बळी ! फायनान्स वाले घरी चकरा मारत होते कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतली गळफास...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق