अनंता दिवनाले,
मलकापूर: जनमित्र म्हणजेच लाईनमन हा महावितरण कंपनीच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतर खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत विजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर लाईनमन दिवस साजरा करण्यात आला आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुलाबराव कडाळे साहेब ( मा.अधीक्षक अभियंता) हे होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री राजेश मिश्रा साहेब, श्री अनिल शेगावकर साहेब,वाणी साहेब,व मलकापूर उपविभाग मधील सर्व लाईनमन हे प्रामुख्याने उपस्थित होते, नंतर दीपप्रज्वलन करून सुरक्षा साधनांची पूजा करण्यात आली व सर्व जनमित्रांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कडाळे साहेब यांनी आपल्या भाषणात महावितरण बद्दल असलेली जनमित्राची आस्था व जनमित्र चे कार्य व गौरव तसेच सुरक्षेबाबत सर्व माहिती दिली. श्री मिश्रा साहेब यांनी प्रास्ताविक मध्ये लाईनमन च्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून लाईनमन वरती येणाऱ्या अडीअडचणी व त्यांच्यावर होणारा अन्यायासाठी मी सदैव जनमित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता दिवनाले यांनी केले,तर आभार प्रदर्शन निलेश सनिसे यांनी केले, व कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र टप ,सुशांत मोहुतरे,अमोल उमाळे, शिवानंद दाते,अनिल चव्हाण, प्रीतम भोसले,किरण तायडे,सचिन ठाकरे,अमृत जाधव, जावरे,बंटी खैरे,भोंबे,व मलकापूर विभाग,उपविभाग मधील सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी परिश्रम घेतले,
إرسال تعليق