Hanuman Sena News

औरंगजेब फोटो प्रकरणी चौघांवर गुन्हा; शरद पवार म्हणाले, तो फोटो औरंगजेबाचा कशावरून?





औरंगाबाद: औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवून धार्मिक भावना भडकवल्याचा गुन्हा चार जणांविरोधात नोंदवण्यात आला आहे. या चार अज्ञात तरूणांचा सध्या शोध सुरू आहे. यादरम्यान हा झळकावलेला फोटो ओरंगजेबाचा खरा फोटो होता असं कशाच्या आधारावर म्हणता असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये किंवा तुम्ही किंवा आम्ही खरा औरंगजेब पाहिलाय? तो फोटो औरंगजेबाचा होता हे कोण कशाच्या आधारावर सांगेल असा प्रश्न विचारत त्यांनी त्या फोटोच्या खरेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतरावर केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. यानंतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराचं नामकरण होणार आहे. याचा सर्व स्तरातून स्वागत होत असतानाच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी इतर काही संघटनांना सोबत घेत आंदोलन केले. "मी औरंगाबादमध्ये जन्माला आलो अन् औरंगाबादमध्येच मरणार" असं वक्तव्य छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं.

Post a Comment

أحدث أقدم