नांदुरा: नांदुरा शहरात शनिवार, ४ मार्च रोजी विविध संघटनांच्यावतीने सकल हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. याप्रकरणी १८ पदाधिकाऱ्यांवर नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच रात्री झालेल्या दगडफेकप्रकरणी ३० व्यक्तिंविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे नांदूऱ्यात तणावसदृश्य परिस्थिती असून पोलीस यावर बारकाईने नजर ठेवून आहे.जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस कायदा १९५१ (कलम ३७ (१) अन्वये अधिसुचना व कलम ३७ (३) अन्वये आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात आदेश लागू असताना मोर्चा आयोजकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून विनापरवानगी हिंदू जन आक्रोश मोर्चा वाजतगाजत ध्वनीक्षेपकासह काढला. तसेच आक्षेपार्ह घोषणाबाजी करून आणि काहींनी प्रक्षोभक भाषण करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी १८ पदाधिकाऱ्यांविरुद्ध कलम १४३, १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे.दरम्यान, मोर्चातील काही घोषणांवर विशिष्ट समाजातील युवकांनी आक्षेप घेतला नांदुरा पोलीस ठाण्यासमोर दोनशे ते तीनशे लोकांनी काही वेळा धरला ठाणेदार अनिल बेहरानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयम ठेवत त्यांची समजूत घालून परत पाठविले मात्र काही लोकांनी परत गैर कायद्याची मंडळी जमवून जमावाला देत त्यांच्या भावना भडकविल्या संतप्त जमाव हातात दगड विटा, लाटा, काठ्या, घेऊन अन्य धर्मीयांच्या वस्तीवर चाल करून गेले यावेळी त्यांनी दगडफेक केली नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत हलेखोरांना पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले यामुळे संभाव्य संघर्ष टळला या प्रकरणी पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली त्यानुसार 30 जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
हिंदू जन आक्रोश मोर्चा नंतर दगडफेक; विविध पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق